कसा वाढवावा स्वतःमधला आत्मविश्वास ?

Spread the word

कसा वाढवावा स्वतःमधला आत्मविश्वास ?

अनेकदा आयुष्यात असे काही प्रसंग येतात की आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जिवनावर आणि कामावर होतो. जर आत्मविश्वास गमावला तर सर्व काही गमावलं असंच म्हणावं लागेल. कारण आत्मविश्वास तुम्हाला जिंकण्याची उर्जा देतो. आत्मविश्वास तुम्हाला जगण्याची उर्मी देतो. जर तुम्ही कधी आत्मविश्वास गमावला तर तो परत मिळवणं गरजेचं आहे. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हालाही तुमचा गमावलेला आत्मविश्वास वाढवता येतो.
काळजी करणं सोडा:
चेहर्‍यावर कायम प्रसन्नतेचा भाव असू द्या. चेह-यावर असलेली एक स्माईल तुमचं मन प्रसन्न ठेवण्यास मदत करते. आतून द्वंद्व असेल तरी ते भाव चेहर्‍यावर येता कामा नये. सर्वांना मदत करा. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. मात्र, चुकत असलेल्यांना पाठीशी घालू नका. अधिक कठोर नाही तरी योग्यरीत्या त्याला मार्गदर्शन करा.
स्वत:ची स्तुती करणे चूक नाही:
दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवून पाहा. व्यवस्थित कपडे परिधान करा आणि अप टू डेट राहण्याचा प्रयत्न करा. जरी कंटाळा येत असला तरी कोणातही काम सोडतं घेऊ नका. परफेक्ट माइंडसेटने घराबाहेर पडा. दिवसभरात कोणीही तुमची कशाबद्दलही स्तुती केली तर आभार माना परंतू गर्व बाळगू नका.

(विस्मृतीपासून सुटका हवी ? मग कॉफी प्या…)
चांगल्या लोकांची संगत गरजेची:
तुमचा आत्मविश्‍वास आजूबाजूच्या लोकांवरही अवलंबून असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहणार असाल तर तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच येणार, पण जर तुम्ही निगेटिव्ह लोकांसोबत राहत असाल तर त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम होऊ शकतो. जे लोकं तुम्हाला प्रोत्साहित करतात, पडत्या काळात तुमची मदत करतात किंवा जे लोकं योग्य मार्गदर्शन करतात. मग ती व्यक्ती कुटुंबातील, मित्र किंवा सहकारी कुणी का असेना त्यांची संगत धरा.
अशक्य गोष्ट असली तरी प्रयत्न करा:
अनेकदा आपण एखादी गोष्ट अशक्य आहे असं समजून प्रयत्न करणं सोडतो. मात्र प्रयत्न न करण्यामुळे तुम्ही तुमचा मोठा लॉस करता. प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी त्यातून मिळालेल्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकता येते. या गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढवतात. तुम्हाला स्वतःलाच काही गोष्टी कळू लागतात की जर आणखी थोडा प्रयत्न केला असता तर यश सहज मिळालं असतं. त्यामुळे प्रयत्न करणं कधीही सोडू नका.

स्वत:साठी वेळ काढा:
दिवसभराच्या धावपळीत स्वत:ला काय दिले याचा विचार करा. अर्थात स्वत:ला वेळ द्या. थोड्या वेळासाठी एकांतात रहा. स्वत:बद्दल विचार करा. मेडिटेशन करा किंवा स्वत:च्या हॉबीला वेळ द्या. स्वतःमध्ये असलेली हॉबी तुमच्या आयुष्यात पुन्हा रंगत आणते. तुमचा आत्मविश्वास वाढवते. पाहा यातील काही गोष्टी करून. याचा नक्की फायदा होईल तुम्हाला.