आवळ्याचे फायदे व उपयोग

Spread the word

छोटया आवळ्याचा उपयोग हा आज नाही तर पुरातन काळापासून ऋषींनी उपयोगात आणलेले आहे.वृध्द ऋषींनी जेव्हा आवळ्याची चटणी बनविली व नित्य खाल्ली तेव्हा त्यांना जाणीव व्हायला लागली की त्यांची कार्यक्षमता ही वाढत चालली आहे. त्यावरून त्यांनी अनेक प्रकारची जडिबुटी त्यात मिळविली व च्यवनप्राश तयार झाले.जे आजगायत लोकं खात आहे.व सुदृढ बनत आहे.
चला तर मग आवळ्याचे उपयोग पाहूया.

  1. पिकलेला आवळा खाल्याने भूक वाढते.
  2. पाचन क्रिया वाढविण्यास मदत होते व शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
  3. पित्तमध्ये हे अतिशय गुणकारी आहे.
  4. त्वच्याविकारात खूप फायदा होतो.
  5. स्मरणशक्ती साठी अतिशय उपयोगी आहे.ज्यांना स्मृतिभ्रंश आहे त्यांनी नियमित सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास निश्चित मदत होते.
  6. जर काही केल्या कफ बाहेर पडत नसेल आवळ्याचा बारीक कूट करून ते रात्री कोमट पाणी किंवा दुधाबरोबर घेतल्यास कफ हमखास बाहेर पडेल.
  7. काही मुलांना बोबडे बोलायची सवय असते त्यांना जर दिवसातून दोन तीन वेळा पिकलेला आवळा चावून चावून खाण्यास दिला तर त्यांचा बोबडेपणा नक्कीच काही अवधीत दूर होईल.
  8. एक भाग हरडा, दोन भाग बेहडा, तीन भाग आवळा, म्हणजे त्रिफळाचे चूर्ण रात्री भिजत घालून सकाळी तीन ते चार वेळा गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते .
  9. आवळ्या मध्ये विटॅमिन सी भरपूर असल्याने दाट केस व तेजस्वी चेहऱ्यासाठी आवळा उपयोगी आहे.आवळा सेवन केल्याने मुत्ररोग दूर होतात.मासिक पाळीदरम्यान दुखणे कमी होते.बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, पोट फुगणे, लठ्ठपणा अशा अनेक समस्या आवळ्याच्या सेवनाने दूर केल्या जाऊ शकतात.