“आणि त्या बदलल्या”…भाग 3

Spread the word

खरंय अमित..!आमचीही थोडी चूक आहेच…एकुलती एक म्हणून …जरा जास्तच लाडाऊन ठेवली आम्ही तिला…
आल्यावर बोलते तिच्याशी आणि त्याने फोन ठेवला…

त्रिज्जा ने मुद्दाम कोणालाच काही सांगितले नाही…

रात्री नऊ च्या आसपास दारावरची बेल वाजली…मुद्दाम त्रिज्जा ने दार उघडले…दारात निकिता ला बघून जरा आश्चर्याने म्हणाली…

निकिता तू..! आणि अशी अचानक…! अग एक फोन तरी करायचा न…? काय ग …मीटिंग बिटिंग आहे की काय…?
आणि हे काय…सामान काहीच नाही…?

ती जरा खेसकुनच म्हणाली…वहिनी आधी मला घरात येऊ दे..! मग विचार तुला विचारायचे तेवढे प्रश्न…

सॉरी..! म्हणून ती बाजूला झाली…काहीही न बोलता आधी सगळे जेवायला बसलो…

मग तिने घर सोडून आल्याचा बॉम्ब स्फोट केला…जेवतांना घरी काय काय घडले ते सांगितले…आणि सासूने त्याला दिलेले उत्तर सुद्धा ऐकले…

तरी नचिकेत बोललाच …

निकिता इतक्या छोट्या कारणासाठी कुणी असं घर सोडून येत का..?

बाबा मात्र खूप रागावले…बरंच बोलले…पण आई तिची पाठराखन करत होती…तिथेच सगळं फावल…

त्रिज्जा ने गप्प राहणे पसंत केले…जेवण आटोपून, सगळी आवराआवर करून…सकाळच्या डब्याची तयारी करून …त्रिज्जा बेडरूम मध्ये झोपायला गेली…

रूम मध्ये नचिकेत फेऱ्याच मारत होता…त्रिज्जा ला पाहून म्हणाला…

काय मूर्ख मुलगी आहे..?

आणि आई तिला पाठिंबा देते..!

त्रिज्जा इतकंच म्हणाली …नचिकेत तू शांत हो…मी उद्या अमितशी बोलते…होईल सगळं नीट…तिला थोडी समज कमी आहे इतकंच…

तू नको काळजी करू..! आणि त्याला मिठीत घेऊन झोपी गेली…

सकाळी सगळे आवरून ऑफिस ला गेली…लंच टाइम मध्ये अमित ला फोन केला…अमितने घडलेला सगळा प्रकार सांगितला…

इतक्या छोट्या कारणासाठी हि घर सोडून आली…याचे वाईटही वाटले…संध्याकाळी घरी आली…जेवण बनवले…सगळ्यांचे आवरून बेडरूम मध्ये गेली…

नचिकेत तिचीच वाट पाहत होता…बहिणीच्या अश्या वागण्याने दुःखी झाला होता…त्रिज्जा त्याला जवळ घेऊन बसली…

म्हणाली नचिकेत माझ्याकडे एक आयडिया आहे…पण त्यात मला तुझी साथ हवी आहे…
अग बोल ना…! मी सदैव तुझ्या पाठीशी आहे…
“ती म्हणाली नक्की”…
तो म्हणाला…हो ग बाई…!
सांग तुझी एकदाची आयडिया…

ती म्हणाली नचिकेत सकाळी आपण घाईत असतो …त्यामुळे बोलायला जमत नाही… रात्री आपण घरी येऊ तेव्हा… मी वेगळं राहायचं असं घरात जाहीर करणार…
काय…?
ये बाई वेडबीड लागलं का तुला…?

का तुझ्या अंगात निकिता घुसली…?
नचिकेत मी हे सगळ नाटक करणार..!
काय…? नाटक करणार..?
आणि का..?

तुझ्या नाटक करण्याचा आणि निकिताचा काय समंध..?

खूप मोठा समंध आहे नचिकेत…पण तू आधी प्रॉमिस कर…तू कोणताही गैरसमज करणार नाही..?

नाही करणार ग बाई..! सांग काय ते एकदाचे..?

हे बघ नचिकेत … मी या घरात यायच्या आधी पोळ्या करायला बाई होती…बरोबर..!
होय..! पण त्याचा इथे काय समंध..? समंध आहे नचिकेत..!

मी लग्न होऊन या घरात आले…आणि आईंनी बाई काढून टाकली..!

तेही बरोबर…

का… तर म्हणे सूनेलाही काही काम करायला पाहिजे..!

अरे हो हे माझ्या लक्षातच नाही आलं… तो मुद्दाच नाही नचिकेत…
पुढे ऐक…

नचिकेत…माझ्या आईकडेही पोळ्यांना बाई होती आणि अजूनही आहे…म्हणून मी इथे करत नाही का..? पण निकिता आणि आईंना हे अजूनही नाही कळले…
म्हणजे…
म्हणजे…नचिकेत

त्या सुनेला वेगळा न्याय आणि मुलीला वेगळा न्याय लावतात…आणि हेच मला दाखऊन द्यायचे आहे…

फक्त या दोघींचे डोळे उघडण्यासाठी..!

त्यासाठी तुझी साथ खूप महत्वाची आहे…नचिकेत म्हणाला …तुला जर हे योग्य वाटत असेल तर तू नक्की कर त्रिज्जा …
फक्त जे करशील ते नीट विचार करून…

नचिकेत अमितशी बोलले मी…त्यावरूनच मी हा निर्णय घेतला…माझ्या अश्या वागण्याने झालातर फायदाच आहे…नुकसान नाही…ठीक आहे म्हणून दोघे झोपी गेले…

सकाळी त्रिज्जा उठली …नित्यनेमाची कामे केली…आणि ऑफिस ला गेली…

घरी गेल्यावर कशी सुरवात करू…याची दिवसभर जुळवाजुळव करत होती…रात्री घरी आली…

पाण्याचा ग्लास घेऊन खुर्चीत बसली…सावकाश पाणी प्यायली… नचिकेत यायचा होता…म्हणाली..
आई, बाबा..!
मी आणि नचिकेत येत्या रविवारी नवीन घरी रहायला जाणार आहोत..!
सासू बाई म्हणाल्या… काय..?
काय म्हणाली..? पुन्हा बोल..?
होय आई..!
आम्ही नवीन घरी राहायला जातोय..?
अग पण असं अचानक…
सासू सासऱ्यांना काही सांगायची पद्धत आहे की नाही..?
आणि नचिकेत..! तो सुद्धा एका शब्दाने बोलला नाही..!

अरे असे कसे वागू शकता तुम्ही दोघे..!

आई खरं सांगू …नचिकेत म्हणाला मला आईबाबांना सांगू म्हणून…परंतु तुम्ही दुखावले जाणार म्हणून मीच त्याला मनाई केली…
काय..?

तूच त्याला मनाई केली..? आणि दुखावले तर आम्ही आताही गेलोच न..! तुला काय म्हणा आमच्या दुःखाच..!
तोही बरा तुझ्या हो.. ला… हो… करतो..! अग थोडा तरी आमचा विचार करायचा ना..!

ती एकदम शांत स्वरात म्हणाली…आई तुमचाच विचार करून इतके दिवस गप्प होते…
पण आता निकिता आली आहे आई… तुम्हाला सोबत..! आणि म्हणूनच मी आज हे सांगायचे धाडस केले…

आई नचिकेतला हे असं वेगळं राहणं अजिबात पटत नाही…फक्त माझ्यासाठी तो हा त्याग करतो…
वा..! वा..!
म्हणे त्याग करतो..!
आमचाच दांम खोटा ग बाई..! तुला बोलून तरी काय उपयोग..?
आई, अहो असं काय बोलता..!
हवं तर तुम्ही येत जा तिकडे राहायला..! आम्हीही येऊ तुम्हाला भेटायला..!

अग पण मुळात तुम्हाला जायचेच का..? इतका मोठा तीन बेडरूम, हॉल आणि किचन चा ब्लॉक सोडून..!

खरं सांगू आई..!

मला ऑफिस मधून येऊन इतकं सगळ काम करणं खरचं झेपत नाही हो..!

त्यात तुम्ही पोळीवाली बाई पण बंद केली..! मला माहेरी अजिबात काम करायची सवय नाही…

माझ्या आईकडे सगळ्या कामाला बाई आहे…त्यामुळे खूप थकायला होत…

त्यात आई आम्ही एखाद्या रविवारी विचार करतो आज बाहेरच खाऊ काहीतरी…पण नाही..!
तुमच्यासाठी करून जावंच लागत…!
नाही झेपत हो मला..!

आता आमचा दोघांचाही पगार चांगला आहे…आई तिकडे आम्ही रात्रीचे जेवण करायला बाई ठेवणार आहे..! सगळं बोलणं झालं आमचं…! सगळीच तयारी झाली जवळ जवळ..! आई तुम्हाला वाईट वाटण साहजिक आहे…
त्याबद्दल खरंच सॉरी…
काही सॉरी बिरी नको…
चांगला गुंडाळून ठेवला ग बाई माझ्या पोराला..!तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात..!
बोलतेस न सर्वांशी गोड..!
हा सारा देखावा आहे..! सारखी आई..! आई..! बाबा..! बाबा..! करत असते..!
सारं नाटक..!
बरं जमत बाई एकेकाला..! तू तर माहीरंच ग बाई यात..! देवा काय वाढून ठेवले रे आमच्या नशिबात..? एकुलता एक मुलगा आणि सून असं वागले तर काय वाटते त्या आईबापांना…तुला नाही कळणार ग..!
त्रिज्जा व्याकुळ होऊन म्हणाली…आई अहो काहीतरीच काय बोलता..!
तुम्हाला सोडून जातांना आम्हालाही त्रास होणारच..!
तुला कसला त्रास ग..! ।मस्त मनातल्या मनात खुश असशील…वेगळं राहायचं सुख अनुभवायला..! शेवटी त्रिज्जा जरा रागातच म्हणाली…तुम्हाला जे समजायचे ते समजा..!

त्रिज्जा पुन्हा नम्र पणे बोलली..! आई ,तुम्हाला वाटेल निकिता आली म्हणून मी हे मुद्दाम करते…पण आई बाबा खरंच तसं काही नाही…

आम्ही एक महिन्यापासून भाड्याचे घर शोधत होतो…आठ दिवसांपूर्वीच मिळालं… थोडं फार सामान पण घेतलं आम्ही तिकडे…
आता निकिता इथेच आली..त्यामुळे तुमचीही चिंता नाही… चला जे होत ते चांगल्या साठीच होत म्हणायचं…

निकिता इथे असल्यामुळे… आता आम्हाला इथून जातांना तुमची चिंता राहणार नाही…

त्यानां हा धक्का देऊन ती स्वयंपाक करायला गेली…तिच्या स्वभावात नसतांना आज ती इतके कठोर बोलली होती…अगदी पहिल्यांदाच…त्यामुळे तीच जास्त दुःखी झाली होती…जेवण बनवण्यात लक्षच लागत नव्हतं…शेवटी खिचडीचा कुकर लावला…लोणचं, पापड आणि खिचडी केली…

नचिकेतही आला तोवर…त्याला याबद्दल काहीच माहित नव्हते…त्याला मी बोलणार हे माहित होत…पण आजच बोलणार हे माहित नव्हतं…
रोजच्या प्रमाणे जेवता जेवता गप्पा मारणे हा त्याचा दिनक्रम होता…आज सगळे शांत शांत होते…त्याला जरा आश्चर्य वाटले…मग त्रिज्जा ने त्याला इशारा केला…नचिकेत म्हणाला.. काय झाले..?

का सगळे असे गप्प गप्प.. तेव्हा आई गुस्यातच म्हणाल्या…काय ते तुझ्या बायकोलाच विचार..?

आम्हाला कधीच वाटलं नाही…की तू इतक्या लवकर बायकोच्या ताटा खालचे मांजर होशील म्हणून..?
मग तो समजून गेला…त्रिज्जाने तिचे काम फत्ते केले…तो काहीच माहित नाही या अविर्भावात बोलला…

आई…बाबा…त्रिज्जा तुम्हा तिघांपैकी प्लीज मला कोणी सांगेल का..? काय झालं ते…
मग त्रिज्जाच म्हणाली…काही नाही नचिकेत… येत्या रविवारी आपण वेगळे राहणार आहो हेच आणि एवढेच सांगितले मी…

बाकी एक शब्द पण उना बोलले नाही… तुला तर माहित आहे…ते माझ्या स्वभावात पण नाही…

नचिकेत ने तिच्या सुरात सूर मिसळला…तो म्हणाला… होय आई अगदी खरं आहे हे…आणि त्यानेही थोडा विचार केला…आणि फेकायला सुरवात केली… म्हणाला…

त्रिज्जा आपण कल्याणला भाड्याने घेतलं ते घर मी आजच कॅन्सल केलं..! आणि ठाण्याला घेतलं..!
तेवढाच तुझा पाऊण तास वाचेल..! तुला आल्यावर थोडा आराम मिळेल..! सहा महिने झाले नुसती पळापळ चालली तुझी..!
खूप दमते आई ती..!

आई , म्हणाली हो रे बाबा..! खूप दमते तुझी बायको..!
जा..! जा..! तुम्ही ठाण्याला राहायला जा..!

खूप काम पडत न तुझ्या बायकोला..! खूप दमते ती..! ओझेच वाहावे लागते या घरात तिला..! आणि स्वभावात नसतांना त्रिज्जाच्या प्लान नुसार तो जरा चिडूनच बोलला…म्हणाला…

आई, तू खरंच ग्रेट आहेस..!
अग एक दिवस निकिताला जेवण बनवायला लागले तर निकिता वेगळं राहायचं म्हणते..!

नाहीतर जेवण बनवायला बाई ठेवायला सांगते..!
अमितने थोडा धीर धर म्हंटले तर ही मुलगी चक्क घर सोडून आली..!

काय वाटत असेल ग तिच्या सासरच्या लोकांना..? आणि अमितला…?
आणि त्रिज्जा सहा महिने झाले…सगळं करते…विनातक्रार…

उलट ती आली म्हणून तू चपाती करणारी बाई बंद केली…आणि मुलीला मात्र याच कारणासाठी वेगळं राहायचा सल्ला देते..!

आई अशी दुटप्पी कशी काय वागू शकते ग तू..? त्रिज्जा काही बोलत नाही…म्हणून तू तिची अशी परीक्षा घेते…

आणि आज ती वेगळं राहायचं म्हणते …तर तिला आणि मला वेगवेगळे दूषण देतेस…खरंच कीव येते आहे तुझी…
निकिता बघ..! तुझ्या डोळ्याने बघ…! एका मुलाला त्याच्या आईवडिलांपासून दूर करतांना…त्या आईवडिलांना किती यातना होतात..? मला सुद्धा होतात ग…

पण बायको का आईवडील..?
या कचाट्यात सापडतो आम्ही समस्त पुरुष…मग काही अमित सारखे…बायकोची पर्वा न करता आहवडिलांसोबत राहायचा निर्णय घेतात…काही माझ्यासारखे आई म्हणते त्या प्रमाणे…

बायकोच्या ताटाखालचे मांजर होऊन वेगळे राहतात…मी खरं तर त्रिज्जाच्या या निर्णयाच्या विरुद्ध होतो…

पण तू घर सोडून इथे आली…आणि म्हणूनच मला त्रिज्जाच्या मनातली व्यथा कळली…ती काही चुकीचं वागते असं मला तरी या क्षणी वाटत नाही… आणि जरा रागातच म्हणाला…त्रिज्जा एकदोन दिवसातच जाऊ आपण ठाण्याला…तुला कधी सुट्टी घ्यायला जमेल तसं सांग…

मीही त्या नुसार दोन दिवसांच्या रजा टाकतो…आणि त्रिज्जाच्या हात धरून तिला बेडरूम मध्ये घेऊन गेला… तिच्या हातावर टाळी देऊन म्हणाला…
काय मॅडम..? कसा झाला आमचा अभिनय..?
त्रिज्जा म्हणाली… नचिकेत तू तर असली हिरो आहेस रे बाबा..! काय सुंदर भूमिका वठवली म्हणून सांगू…

निकिता , आईबाबा सगळे आपापल्या रूम मध्ये गेले…निकिता विचार करू लागली…खरच त्रिज्जाचा पगार माझ्या पेक्षा जास्त आहे… शिवाय पोस्ट ग्रॅज्युएट झाली… पण ना पगाराचा गर्व..! ना शिक्षणाचा…! उलट आल्या दिवसापासून हसत घर सांभाळते..आई आणि मी कधी एखादया कामाला मदत करत नाही…पण कुठलीही कुरबूर नाही…

आणि आपण लग्न झाल्यापासून चहा शिवाय दुसरं काही केलंच नाही…पण सासूबाई कधी एका शब्दाने सुद्धा बोलल्या नाही… खरंच आज त्रिज्जाने माझे डोळे उघडले…मनोमन त्रिज्जाला तिने धन्यवाद दिले…वेळीच सावध केल्या बद्दल…
थोडं शांत झाल्यावर अमित ला फोन केला…

बोलतांना जीभ अडखळत होती.. कुठून आणि कसं बोलावं सुचत नव्हतं.. तिकडून अमित हॅलो…हॅलो करत होता…
मग ती हळूच म्हणाली …
अमित सॉरी…
मी उद्या सकाळी आपल्या घरी येते…अमित म्हणाला …खरं सांगते निकिता तू हे..! हो अमित…अगदी खरं..! आणि याचे सारे श्रेय तुझ्या बहिणीला…
म्हणजेच त्रिज्जा…माझ्या वहिनीला ..! काय बोलते तू हे..!
हो अमित…खरंच तिने वेळीच माझे आणि आईचे डोळे उघडले..!
आईचे इतकं मला नाही माहित… पण माझे मात्र पूर्ण डोळे उघडले…

आता या घरी मी फक्त पाहुनी म्हणून येणार… ते घर माझे…हक्काचे…
अमित पण मला सांग, तू आई बाबांना काय सांगितले रे…
अग तू जाऊन दोन दिवस पण नाही झाले…मी काय सांगायचे ते सांगितले…त्यानीं तुला फोन पण केला नसेल…होन… हो अमित…
I love you amit…love you too …म्हणत फोन ठेवला..
आता फक्त सकाळ व्हायची वाट पाहायची …घरी जायचा आंनद आणि ती जे वागली तो मूर्खपणा… दोन्हीमुळे तिला झोप लागली नाही…

सकाळीच उठून तयार झाली…त्रिज्जा किचन मध्ये सकाळची तयारी करत होती…तिला मागून जाऊन घट्ट पकडले…
म्हणाली…thank you वहिनी आणि…love you… त्रिज्जा ला कळेना …निकीतला काय झाले…तिला समोर घेऊन म्हणाली…
निकिता काय झालं..?
सकाळी सकाळी वहिणी सोबत गोड गोड…काहीं नाही…तू काल माझे डोळे उघडले…म्हणून…

न समजल्याचा अविर्भाव करत त्रिज्जा म्हणाली…मी आणि ते कसे काय बुवा…आणि मनोमन सुखावली… आपली मात्रा लागू पडली म्हणून मनातून खुश झाली…निकिता म्हणाली…वहिनी मी आजच ,आत्ता माझ्या घरी चालली…आणि पुन्हा तिला मिठी मारली…

कालच्या प्रसंगाने आईबाबा त्याच्या रूम मधेच होते…निकिताने दार वाजवले…बाबांनी दार उघडले…निकिता आत गेली…म्हणाली …आई, बाबा मी आज… आत्ता… माझ्या घरी जात आहे…

आई लगेच उठून उभी राहिली…म्हणाली…
काय..?
हो आई..?आणि हो त्यासाठी त्रिज्जाचे विशेष आभार…तिनेच माझे डोळे उघडले…
काय..? तिने तुझे डोळे उघडले…
काय ग..? ती तुला काही बोलली की काय..? नाही आई…त्रिज्जा मला काहीच बोलली नाही…पण न बोलता…मला खूप काही सांगून आणि शिकवून गेली…

आई तुला नाही काही शिकवण मिळाली का त्रिज्जाच्या कालच्या….वागण्या आणि बोलण्यातून..? नसेल समजले तर समजून घे आई… जे तू मला समजावून सांगायला पाहिजे होत…ते तिने मला तिच्या कृतीतून काल indirect समजावून सांगितले…
नशीबवान आहे आई तू…
तुला त्रिज्जा सारखी गुणी सून मिळाली…आता तरी वेळीच सावध हो..!आणि हो अजून एक आई…
मी मुलगी म्हणून…माझी प्रत्येक चूक पाठीशी घालायचा प्रयन्त करू नको..

आई ज्या दिवशी मी तुला फोन करून सारं सांगितलं…तेव्हा तू मला खडसावून समजावून सांगायला पाहिजे होत…उलट तू आगीत तेल ओतायचे काम केले…आणि म्हणूच माझी ते घर सोडेपर्यंत मजल गेली…
पण हेच सगळं काम तुझी सून विनातक्रार पार पाडते… अगदी हसत… हे तू सोईस्कर रित्या विसरली आई…
काय म्हणावे आई तुला..?
आई अजूनही वेळ गेलेली नाही …आता तरी स्वतात थोडा बदल कर…

आणि आईबाबांना नमस्कार…
त्रिज्जाचे विशेष आभार…दादाला बाय करून निकिता ने ते घर सोडले…
जातांना तिला बाबा म्हणाले…निकिता घरी पोहचली की एक फोन कर…पोहचल्यावर मी तुला एक आनंदाची बातमी सांगणार आहे…

ती म्हणाली…बाबा आत्ताच सांगा न…बाबा म्हणाले नाही बेटा…त्या बातमीचा गोडवा तू तुझ्या घरी गेल्यावरच जास्त जाणवेल…

ठीक आहे बाबा म्हणून ती निघाली…
घरी पोहचली… ती येणार म्हणून आज अमित घरीच होता…
इकडे बाबांनी त्रिज्जाला बोलावले म्हणाले… त्रिज्जा आज तुला माझ्याकडून कोणतं बक्षीस पाहिजे ते सांग…ती म्हणाली…बाबा… बक्षीस..! आणि तूमच्या कडून…
बाबा माझ्या कालच्या बोलण्याने निकिता दुखावून गेली… माहित आहे मला… तुम्हाला राग येण स्वाभाविक आहे… सॉरी बाबा..!

त्यावर बाबा जे बोलले ते एकूण चाटच पडलो आम्ही दोघे… म्हणाले नचिकेतची आई…जरा बाहेर या..! आणि हो जरा लवकर या..त्रिज्जा ला कळेचना…बाबांचे काय चालले ते…

आई लगोलग बाहेर आल्या…निकिता गेल्यामुळे त्याही खूप दुखावल्या होत्या…रागाचा एक कटाक्ष माझ्या आणि नचिकेत वरून टाकला…
बाबा म्हणाले …अहो किती त्रागा करणार आपल्याच लेकरांचा…आधी तो नाकावरचा राग बाजूला करा…आणि माफ करा मुलांना…आई तितक्याच रागाने बघत होत्या….
मग बाबा म्हणाले…
नचिकेत ठाण्याला कुठे घर घेतलं रे तू…! जरा पत्ता सांग बघू… त्रिज्जा आणि नचिकेत एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले…
काय सांगणार…?
मग आईजवळ गेले… म्हणाले…
अहो जरा तो राग बाजूला ठेवा…आणि मी काय म्हणतो ते शांत पणे ऐका…खुश खबर बरं का ही…
हं ऐका तर मग… त्रिज्जा आणि नचिकेत यांनी ठाण्याला ब्लॉक घेतलेला नाही…आपल्याला सोडून ती दोघ कुठेही राहायला जाणार नाही…
अहो पण नचिकेत कालच बोलला न…ठाण्याला जातोय म्हणून…
ते सगळं खोटं आहे…
काय…?
नचिकेत आणि त्रिज्जा यांना कळेना…आपला प्लान बाबांना कसा कळला…मग त्या दोघांजवळ येत म्हणाले… सॉरी…मी तुमच्या दोघांचे बोलणे ऐकले…पण मुद्दाम नाही…बरं का…
त्रिज्जा तू रोज आमच्या बेडरूम मध्ये पाण्याचं भांड ठेवते…निकिता आली…आणि घरातील वातावरण खराब झालं…आणि तू पाणी ठेवायचे विसरलीस…

मी पाणी आणायला बाहेर आलो…तुमच्या बेडरूम मधून बोलण्याचा आवाज येत होता…मी मुद्दाम दाराजवळ उभं राहून…दोन्ही दिवसाचे तुम्हा दोघांचे बोलणे मी ऐकले…

त्रिज्जा म्हणाली काय…?
बाबा म्हणाले..
होय बेटा..!
निकिता घर सोडून आली…तिला आणि आईला एकाशब्दाने न दुखावता तू जो खोटा मार्ग अवलंबला…ऐकूनच मी थक्क झालो…किती सहज तोडगा काढला तू त्यावर…
तुझ्या या खोट्या वागण्यामुळे निकीताला तिची चूक कळली…

तुम्हाला आठवत असेल…ज्या दिवशी तू हे सगळं आम्हाला सांगितलं…त्या दिवशी मी एका शब्दाने तुम्हाला काहीही विचारले नाही…त्याला कारण हेच…
तुमच्या दोघांचा अभिनय… मस्तच…! मस्त रंगवलंय कथानक…!
नचिकेतची आई…! शांत व्हा..! हि आपली गुणी पोरं आपल्याला कधीच सोडून जाणार नाही…उलट सासूसासरे सोडून…वेगळं राहण्याचा निर्णय घेतलेल्या आपल्या लेकीला उत्तम धडा शिकवला या दोघांनी…

आता तरी तुमचे त्या दोघांबद्दलचे विचार बदला… विभाताईंना त्याची चूक कळली.. त्रिज्जा आणि नचिकेतला मायेने जवळ घेतले…

म्हणाल्या त्रिज्जा जमल्यास मला माफ कर…! खरंच चुकले मी…मुलीच्या प्रेमात आंधळी झाली…पण सुनेवर मात्र अन्याय करत राहिली…
त्रिज्जा आजपासून तु सुद्धा सगळ्या स्वैपाकाला बाई ठेव… खरंच खूप करतेस तू… मलाच मेलीला त्याची जाणीव नव्हती..!

तेवढ्यात बाबांच्या मोबाईलची रींग वाजली… निकिताचा फोन होता…
बाबांनी स्पीकर ऑन केला आणि बोलायला सुरुवात केली…
हॅलो…! हॅलो…बाबा…!

बाबा..! आता पट्कन ती आनंदाची बातमी सांगा…! हो नक्की सांगतो बेटा…!
आत्ताच तुझ्या आईला सांगितली…! बाबा..! पट्कन सांगा ना..! प्लीज..!

हं ऐक…! अग त्रिज्जा आणि नचिकेत ठाण्याला राहायला जाणार नाही…!
काय..?
बाबा तुम्ही खरं सांगताय… हो खरय ग…!
पण बाबा…! दादा तर असच बोलला…हो अग …बोलला तो…पण..पण काय बाबा…तुला तुझी चूक कळावी म्हणून…त्रिज्जा आणि नचिकेतने वठवलेलं हे नाटक होत…
काय..?
होय..!
आणि बाबा तुम्हाला हे माहित होत..! प्रत्यक्ष मी यात सहभागी नव्हतो…
पण त्रिज्जा आणि नचिकेत यांचे बोलणे मात्र ऐकले होते… आणि इतकी गुणी सून मिळाली…म्हणून मनोमन खुश होतो.. देवाला मनोमन म्हणालो…त्रिज्जाला तिच्या कार्यात यश दे…

आणि ती…तुला सासरी पाठवण्याच्या कार्यात यशस्वी झाली…हीच खुशखबर तुला सांगायची होती…बाबा खरंच खूप आनंदाची बातमी आहे ही…

तिच्यामुळे मला माझी चूक कळाली… आता मी माझं घर…माझे हे आईबाबा सोडून कुठेही जाणार नाही…जेवण बनवायला सुद्धा शिकणारआहे मी आता..!

बाबा म्हणाले…
Proud of you beta
बाबा माझ्या मूर्खपणामुळे दोन्ही घरांना खूप त्रास झाला …सॉरी…
लगेच त्रिज्जा म्हणाली…ये वेडा बाई..! असं फक्त सॉरी म्हणून नाही चालणार हं…पार्टीच घेणार आता…

वहिनी..! खरंच तुझे आभार कसे मानू ग..! आत्ता कळले मला …
का आजकाल इतके घटस्पोस्ट होतात..?

आम्ही लाडावलेल्या मुली…माझंच खरं असं वागतो…झुकणं सोडूनच दिलं आम्ही…तडजोड हा शब्द संसार नावाच्या डिक्शनरीतून आम्ही मुलींनी वजाच केला…

आणि उरले सुरले काम आम्हा मुलींच्या आई करतात…आई लगेच म्हणाली…
अगदी खरं बोलली तू निकिता…
तु सुद्धा जमल्यास या आईला माफ कर…
खरंच मला माझी चूक कळली ग…

माझ्या सारख्या मुलीच्या संसारात लुडबुड करणाऱ्या समस्त आई लोकांना त्रिज्जाच्या या उदाहरणाने चांगला धडा मिळाला ..मी इतकंच म्हणेन..मैत्रिणींनो…मुलीवर प्रेम करा…पण माझ्या सारखं आंधळ प्रेम करू नका… जेणे करून मुलींचे संसार उद्धवस्त होतील…
पुन्हा तुम्हा सगळ्यांची माफी मागते…

बाय बेटा म्हणून…बाबांनी फोन कट केला…
विभाताईने पुन्हा सॉरी म्हणून…त्रिज्जाला मायेन मिठी मारली…दोघींचेही डोळे आनंदाश्रूंने ओथंबळे होते…

समाप्त….

सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण